आयटीआय खामगावची समुपदेशन प्रवेश फेरी
Ø उमेदवारांनी ऑनलाईन
नोंदणी करण्याचे आवाहन
बुलढाणा, दि. १९ (जिमाका)
: सतगुरू
श्री अगाशे काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगांव या संस्थेतील शिल्प कारागिर
प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट २०२५ च्या प्रवेश सत्रात संस्थेमध्ये नवीन वेळापत्रकानुसार
प्रवेशाच्या समुपदेशन फेरी घेण्यात येणार आहे. या समुपदेशन फेरीद्वार प्रवेश घेण्याकरीता
उमेदवारांनी २२ सप्टेंबर रोजी संस्थेत व्यक्तीशः हजर राहून आपली ऑनलाईन नोंदणी करावी.
त्यानंतर रिक्त होणाऱ्या जागेवर ३० सप्टेंबर २०२५ रोजी पर्यंत दररोज प्रवेश फेरी होईल,
अशी माहिती आयटीआयचे प्राचार्य एस.डि. गंगावणे
आणि उपप्राचार्य व्हि. व्हि. काळे यांनी दिली.
प्रवेशाकरीता या संस्थेत विविध व्यवसायाच्या सद्यस्थिती एकुण १४ जागा
रिक्त आहे. जे उमेदवार ऑनलाईन नोंदणी/हजेरी नोंदवतील त्याच उमेदवारांची मेरीट यादी
तयार होईल व मेरीट यादी नुसार रिक्त असणाऱ्या व्यवसायाच्या जागेवर नियमानुसार प्रवेश
देण्यात येतील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
ऑनलाईन नोंदणी/हजेरी नोंदविणा-या उमेदवारांनी संस्थेत दिनांक २२ सप्टेंबर
२०२५ रोजी सकाळी ९ वाजता संस्थेत व्यक्तीशा हजर राहावे, असे आवाहन आयटीआयचे प्राचार्य
एस.डि. गंगावणे आणि उपप्राचार्य व्हि. व्हि.
काळे यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment