युवकांनी विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग क्विझमध्ये सहभागी व्हावे -जिल्हा युवा अधिकारी प्रणीत सांगवीकर यांचे आवाहन
Ø सर्वोत्तम स्पर्धेकांचा गौरव होणार
बुलढाणा, दि. 18 (जिमाका) : ‘मेरा युवा भारत’, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालयाच्यावतीने देशभरातील युवकांना
विशेष उपक्रमात सहभागी करुन घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विकसित भारत यंग
लीडर्स डायलॉग क्विझ आयोजित करण्यात आला असून या क्विझमध्ये जिल्ह्यातील युवकांनी सहभागी
व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या क्विझमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक युवक-युवतीला
माय भारत पोर्टल तर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार असून सर्वोत्तम गुण मिळविणाऱ्या स्पर्धेकांचा
विशेष गौरव केला जाणार आहे. युवकांनी ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी, स्वत:ला सिध्द करण्यासाठी
तसेच प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या क्विझमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. क्विझमध्ये
सहभागी होण्यासाठी युवकांनी https://mybharat.gov.in वर नोंदणी करुन क्विझ सोडवावा.
“बुलढाणा जिल्हा हा राज्यात सर्वाधिक सहभाग नोंदविणारा
ठरावा या हेतूने जिल्ह्यातील युवक मंडळे, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था तसेच
युवकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे,” असे आवाहन बुलढाण्याचे जिल्हा युवा अधिकारी प्रणीत सांगवीकर यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment