बुलढाण्यात बुधवारी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : जिल्हातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या
संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर बुलडाणा आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बुलढाणा
संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन बुधवार दि. 24 सप्टेंबर रोजी येथील शासकिय
औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे करण्यात आले आहे
सदर रोजगार मेळाव्यामध्ये
बजाज ऑटो प्रा.लि. छत्रपती संभाजी नगर या उद्योजकांनी त्यांच्याकडील इलेक्टीशियन, वेल्डर,
डिझेल मॅकनिक, फिटर, मशीनिष्ठ रिक्त पदे अधिसुचित केलेली आहे. या कार्यालयाकडे नोंदणीकृत
उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
या मेळावाद्वारे सदर कंपनीच्या प्रतिनिधीद्वारे गरजू व रोजगार इच्छुक उमेदवाराच्या
मुलाखती घेण्यात येवून त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे.
पात्र,
गरजु व नौकरी इच्छुक उमेदवार आपल्या शैक्षणीक पात्रतेच्या आधारे मुलाखत देऊ शकतात.
तरी दि. 24 सप्टेंबर रोजी शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलढाणा येथे आवश्यक त्या
कागदपत्रांसह सकाळी 10 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहुन नाव नोंदणी करुन कंपणीच्या प्रतिनीधी
समवेत मुलाखत द्यावी. बुलढाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारानी या संधीचा लाभ
घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त
ग.प्र. बिटोडे यांनी केले आहे
याबाबत काही अडचण आल्यास
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाच्या
(०७२६२-२४२३४२) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
Comments
Post a Comment