"स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ
जिल्हा स्त्री रुग्णालय येथे थेट प्रक्षेपणाचे आयोजन
बुलढाणा, दि. 17 (जिमाका) :पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज, 17 सप्टेंबर 2025 रोजी "स्वस्थ
नारी, सशक्त परिवार" या विशेष अभियानांतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालय, बुलढाणा
येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले. हा कार्यक्रम इंदूर येथून थेट प्रक्षेपित करण्यात आला.
अभियानाचा
शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये महिलांचे आरोग्य सुदृढ ठेवणे, कुटुंबाची
आरोग्यसंपन्नता सुनिश्चित करणे आणि महिला सबलीकरणास चालना देणे हे होते.
रुग्णांना
पोषण आहार किट्स वाटप
जिल्हा क्षयरोग केंद्र व जिल्हा क्षयरोग धाम, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोगावर उपचार घेत असलेल्या 10 रुग्णांना पोषण आहार किट्स मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या उपक्रमामुळे रुग्णांच्या पोषण स्थितीमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन सामान्य रुग्णालयाचे आहार तज्ज्ञ साहेबराव सोळंकी यांनी केले.
00000
.jpg)
.jpg)
.jpg)
Comments
Post a Comment