जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अधिनस्त सात गाळे भाडे तत्वावर देण्यात येणार
§ माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी यांना संधी
§ अर्ज करण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंतची मुदत
बुलढाणा, दि. 18 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिनस्त मेन रोडवर स्थित असलेले
(10x20) सात गाळे 12 हजार रुपये प्रती गाळ्याप्रमाणे प्रतिमाह विद्युत बीला व्यतिरिक्त
भाडे तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक जिल्ह्यातील माजी सैनिक,
माजी सैनिक विधवा तसेच वीरपत्नी यांनी आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा
यांच्याकडे 22 सप्टेंबर 2025 पर्यंत जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
यांनी
माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांची नोंदणीकृत बँक पतसंस्था,
माजी सैनिक महिला बचत गट, माजी सैनिक, विधवा (वैयक्तिक व्यवसाय), इतर नागरिक कार्यालयाचे
गाळे भाडे तत्वावर देण्यासाठी असा प्राधान्यक्रम ठरवून दिलेला आहे.
गाळ्यांची जमा करण्यात येणारी सुरक्षा अनामत रक्कम एका
वर्षाचे भाडे राहील. करारनामा जिल्हा निबंधक कार्यालय यांच्याकडे नोंदणी करुन भाडे
करारनाम्याचा कालावधी दोन वर्ष राहील. भाडेकरु यांनी सादर केलेले अर्ज सैनिक कल्याण
अधिकारी यांच्याकडून मंजूर झाल्यानंतर करारनामा अटी व शर्तीनुसार करण्यात येईल व बाध्य
राहील. मुदतीनंतर प्राप्त अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, असे जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment