महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा 28 सप्टेंबरला



Ø 
बुलढाण्यातील 6 उपकेंद्रांवर होणार परीक्षा

Ø  परिक्षांमध्ये कॉपी, गैरप्रकार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू

Ø  जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांचा आदेश जारी

 

बुलढाणा, दि. 25:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) आयोजित महाराष्ट्र नागरी सेवा (राजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही रविवार, 28 सप्टेंबर रोजी बुलढाणा मुख्यालयातील 6 उपकेंद्रांवर दोन सत्रात होणार आहे. ही परीक्षा सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत पार पडणार आहे.

या परिक्षेदरम्यान परिक्षेतील गैरव्यवहार टाळण्याच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून तसेच परीक्षा दरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्था बाधीत होऊ नये आणि परीक्षा केंद्रावर अनधिकृत व्यक्ती किंवा वाहनास प्रवेश बंदी घालणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी यांनी बुलढाणा मुख्यालयातील एकूण सहा उपकेंद्रावर रविवारी 28 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून ते परीक्षा पूर्ण होईपर्यंत परिक्षा केंद्राच्या आतील संपूर्ण परिसरात व केंद्राचे बाहेरील लागून असलेल्या परिसरामध्ये हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे.

जिल्हादंडाधिकारी यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करतांना काही अटी व शर्ती घालुन दिल्या आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्राचे परिसरामध्ये प्रवेश करतेवेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रीतरीत्या प्रवेश करता येणार नाही तसेच कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्याबाबत मज्जाव करण्यात आले आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशीन, पाणपट्टी, लॅपटॉप, टायपिंग सेंटर  एसटीडी बुध ध्वनीक्षेपक इत्यादी माध्यम परिक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात यावे. परीक्षा केंद्राच्या परिसरात इंटरनेट, मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई राहील. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्ती/वाहनास प्रवेशास मनाई राहील. परीक्षा केंद्रावरील नियुक्त अधिकारी, कर्मचारी, परिक्षार्थी तसेच परीक्षा केंद्रावर देखरेख करणार अधिकृत अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांना हे प्रतिबंधात्मक आदेश परिक्षासंबंधी कर्तव्य पार पाडण्याचे दृष्टीने लागू राहणार नाहीत.

"परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार किंवा कॉपीचा प्रयत्न झाल्यास जिल्हा प्रशासन व आयोग त्याची गंभीर दखल घेईल. कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी दक्ष आहे. कोणत्याही नियमभंगावर कठोर कारवाई केली जाईल. परीक्षार्थींनी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचावे आणि मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साधने न आणु नये. तसेच, परीक्षार्थींनी अनुचित साधनांचा वापर न करता प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी," असे आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

 

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या