क्षय आरोग्य धाम येथे राष्ट्रीय पोषण महिना निमित्त जनजागृती उपक्रम साजरा

 



बुलडाणा, दि. 30 सप्टेंबर (जिमाका): दरवर्षी सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येतो. रुग्णाच्या आरोग्या संबंधित तक्रारी साठी केवळ औषधोपचारावर अवलंबून न राहता आहार देखील एक उपचार किंवा आहारद्वारे आरोग्य या विषयी समाजात जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने कुपोषनावर आळा घालण्यासाठी पोषण महिना साजरा केला जातो. तसेच महिलांचे आरोग्य हे कुटुंबाच्या आणि समाज्याच्या आरोग्याशी थेट जोडलेले आहे. याच उद्देशाने राज्य व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत स्वस्थ नारी, सशक्त परिवार हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. ज्यामध्ये महिलांच्या विशिष्ट आरोग्य विषयक सेवेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रित केले जात आहे. याच  अनुषंगाने दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी क्षय आरोग्य धाम बुलढाणा येथे सर्व क्षय बाधित  रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी आहार प्रदर्शनी व आहार मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उदघाटन माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशील चव्हाण यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व धन्वंतरी पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी रुग्णालयच्या आहारातज्ज्ञ डॉ. मयुरी देशमुख यांनी सर्व रुग्णांना अतिप्रतियुक्त आहार संबंधित मार्गदर्शन केले व डॉ. सुशील चव्हाण यांनी महिलांचे आरोग्य व आहार यांचे परिवारात असणारे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित केले. रुग्णालयच्या प्रभारी अधिसेविका अनिता गोडसे व मुकादम चव्हाण  यांच्या तर्फे रुग्णालयात दाखल असण्याऱ्या सर्व क्षय बाधित रुग्णांना प्रोटीन पावडर चे डब्बे वितरित करण्यात आले तसेच परिसेविका मीना जोंधळे व आधीपरिचारिका दाबेराव यांच्यातर्फे पेंडखजूर चे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आहारातज्ज्ञ डॉ. मयुरी देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभारी अधिसेविका अनिता गोडसे, मुकादम रामनंदन चव्हाण व संपूर्ण वर्ग चार कर्मचारी यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमास डॉ. कोठारी, डॉ. तायडे व सर्व क्षय आरोग्य धाम येथील कर्मचारी यांची उपस्थिती होती.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या