शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबरला होणार
Ø ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 3 ऑक्टोबरपर्यंत मुदत
बुलढाणा दि.
16 (जिमाका) : शासनाच्या
वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक
पात्रता (टीईटी) 2025 परीक्षेचे आयोजन रविवार, दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात
येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयुक्त अनुराधा ओक यांनी
दिली.
इयत्ता
1 ली ते 5 वी (पेपर 1) व इयत्ता 6 वी ते 8 वी (पेपर 2) साठी सर्व व्यवस्थापन, सर्व
परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये
शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमदवारांना प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण होणे
अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निण, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र
राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध
आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा
तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. सर्व संबंधित परीक्षार्थ्यांनी
या संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. या परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया
सोमवार, दि. 15 सप्टेंबर 2025 पासून सुरु झाली आहे. परिक्षार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने
परीक्षेचे आवेनपत्र शुक्रवार, दि. 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत भरता येतील.
ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा
कालावधी दि. 15 सप्टेंबर 2025 ते 03 ऑक्टोबर 2025 असा आहे. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट
काढुन घेण्याचा कालावधी दि. 10 नोव्हेंबर 2025 ते 23 नोव्हेंबर 2025 असा आहे. शिक्षक
पात्रता परीक्षा पेपर 1 रविवार, दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी
1 वाजेपर्यंत राहील तसेच शिक्षण पात्रता परीक्षा पेपर 2 रविवार, दि. 23 नोव्हेंबर 2025
रोजी दुपारी 2.30 ते दुपारी 5 वाजेपर्यंत राहील.
काही प्रशासकीय अडचणीमुळे या वेळापत्रकामध्ये
बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परिषदेच्या
https://mahatet.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द केली
जाईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment