महिलांसाठी “स्वस्थ नारी-सशक्त परिवार विशेष आरोग्य तपासणी मोहीम
बुलढाणा दि. 15 (जिमाका) : “स्वस्थ नारी-सशक्त परिवार” या अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याविषयी जागरुकता वाढून संपूर्ण कुटुंब निरोगी राहण्यास मदत होणार आहे. त्या निमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत दि. 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोंबर 2025 दरम्यान “स्वस्थ नारी-सशक्त परिवार” या विशेष अभियानांतर्गत जिल्ह्यातील महिलांसाठी आरोग्य तपासणी, उपचार व समुपदेशन मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहीमेत महिलांमध्ये एनीमिया, उच्च रक्तदाब,
मधुमेह, कर्करोग तपासणी तसेच सामान्य आरोग्य समस्यांसाठी तपासणी केली जाणार आहे. याशिवाय
किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य जनजागृती, गर्भवती महिलांची तपासणी व आवश्यक तेथे उपचाराची
तात्काळ सोय करता येणार आहे. या कालावधीत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण
रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये तपासणी शिबिर आयोजि करण्यात येतील.
यामध्ये विशेषज्ञ डॉक्टरांकडून महिलांची तपासणी,
समुपदेशन व उपचार केले जाणार आहेत. या विशेष मोहिमेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व
महिलांनी पुढाकार घेवून आरोग्य तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील,
मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment