Posts

जागतिक मधमाशी दिनानिमित्त बुलढाण्याच्या राजेंद्रदास बैरागी यांना राज्यस्तरीय “मधुमीत्र” पुरस्कार

  बुलढाणा, दि. 21 (जिमाका): जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा सन 2026 चा राज्यस्तरीय “ मधुमीत्र ” पुरस्कार धाड (ता. जि. बुलढाणा) येथील मध उत्पादक व मधुपालक राजेंद्रदास प्रकाश बैरागी यांना प्रदान करण्यात आला. मध उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, दीर्घ अनुभव, मध उत्पादन, मधमाशांच्या वसाहतींचे संवर्धन, प्रशिक्षण तसेच संशोधनात्मक योगदान या निकषांच्या आधारे निवड समितीमार्फत त्यांची निवड करण्यात आली. हा पुरस्कार 20 मे 2026 रोजी संत एकनाथ रंगमंदिर, क्रांती चौक, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित विशेष पुरस्कार वितरण समारंभात प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते बैरागी यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य सभापती (राज्यमंत्री दर्जा) रविंद्रजी साठे, लक्ष्मण अधिकारी, सहमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) राजकुमार डांगर, उप मुख्य अधिकारी (उद्योग) नित्यानंद पाटील, मध संचालक महा...

दिव्यांग मुला-मुलींसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू; 30 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

  बुलढाणा, दि. 21 (जिमाका): दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या मार्फत शासनमान्य तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, ता. देगलुर, जि. नांदेड येथे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी दिव्यांग मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठी १८ ते ४० वयोगटातील अस्थिव्यंग, मुकबधीर, अंध व मतिमंद दिव्यांग विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रशिक्षण केंद्रात विद्युत तारतंत्री, इलेक्ट्रिक डोमेस्टिक उपकरणे दुरुस्ती व सर्व्हिसिंग, मोबाईल रिपेअरिंग अँड सर्व्हिसिंग, फिटर, एलिमेंट ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर ऑपरेशन विथ एम.एस. ऑफिस, डेस्कटॉप पब्लिशिंग (DTP), कॉम्प्युटर अकाउंटिंग व ऑफिस ऑटोमेशन तसेच अगरबत्ती, खडू व धूपनिर्मिती यांसारखे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. इच्छुक दिव्यांग विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांनी दि. ३० जून २०२६ पर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलुर, जि. नांदेड येथे अर्ज पाठवावेत किंवा समक्ष भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तुळजा...

अनोळखी इसमाचा मृत्यू; ओळखणाऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन

Image
  बुलढाणा, दि. 21 (जिमाका): पोलीस स्टेशन, बुलढाणा ग्रामीण परिसरातील अनोळखी मृत व्यक्ती हा अंदाजे 50 वर्षीय पुरुष असून तो दिव्य प्रकल्प आश्रम, वरवंड येथे वास्तव्यास होता. संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असून दिव्य सेवा प्रकल्प आश्रमाचे संचालक अशोक काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती अनोळखी व बेवारस असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचा पत्ता दिव्या फाऊंडेशन, वरवंड, ता. जि. बुलडाणा असा नमूद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन येथे मर्ग क्रमांक २५/२०२६ कलम १९४ भा.ना.सु.सं. अंतर्गत अनोळखी मृत व्यक्तीची नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. कक्षसेवक यांच्या रिपोर्टवरून ही कारवाई करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांचा शोध लागावा यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीबाबत कोणास काही माहिती असल्यास तपासी अधिकारी पोहेकॉ कैलास ऊगले ८८८८८११७१४ / ८८३०२६५२१४ यांच्याशी संपर्क साधावा. 00000

पाणी टंचाई निवारणार्थ सिंदखेड राजा तालुक्यातील निमखेड गावासाठी टँकर मंजूर

     बुलढाणा दि.21 (जिमाका): पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता सिंदखेड राजा तालुक्यातील निमखेड गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी यांनी दिली. निमखेड येथे 570 पशुधन व 910 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 23 हजार 840 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. 000000

पिक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू; महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन

  बुलढाणा दि.21 (जिमाका): राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत अन्नधान्य पिके, भरडधान्य (मका), पौष्टिक तृणधान्य (श्री अन्न) तसेच कडधान्य आत्मनिर्भर अभियान सन 2026-27 अंतर्गत पिक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पीक प्रात्यक्षिक गटांचे अर्ज तसेच प्रमाणित बियाणे वितरणासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मका, पौष्टिक तृणधान्य, तूर, मुग व उडीद या पिकांसाठी इच्छुक शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावेत. “ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ” या तत्वावर अर्ज स्वीकृत करण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे. 000000

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरा

Image
  बुलढाणा,दि.21 (जिमाका) :   जिल्हाधिकारी कार्यालयात आज दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, समाधान गायकवाड यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ’ दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 0000000

विशेष लेख चला ! देशापुढे महाराष्ट्राच्या बचतीचा आदर्श ठेवूया !

  ज्या ज्या वेळी देशावर संकट येते, त्या त्या वेळी महाराष्ट्र हा दिल्लीच्या मदतीला धावून जातो. “ हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला ” ही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासूनची आपली भूमिका आजही तितकीच जिवंत आहे. युद्ध असो, टंचाई असो, महापूर असो की महामारी-महाराष्ट्राने प्रत्येक संकटात देशाच्या पाठीशी उभे राहत मदतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. पश्चिम आशियातील वाढते तणाव आणि त्यातून निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज देश पुन्हा एका मोठ्या आव्हानासमोर उभा आहे. या संकटाचा कालावधी किती असेल हे आपल्या हातात नसले, तरी या अशा काळात संयम, शिस्त आणि बचत यामधून देशाच्या अर्थकारणाला बळ देण्याचे मोठे काम महाराष्ट्र करु शकतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात सर्वप्रथम आवाहन केले. त्यांनी देशवासियांना केलेले आवाहन हे केवळ खर्च कमी करण्याचे नाही, तर राष्ट्रहितासाठी जीवनशैली बदलण्याचे आहे. 'जितकी बचत, तितकी राष्ट्रसेवा' हा संदेश त्यांनी अत्यंत स्पष्टपणे दिला आहे. अनावश्यक इंधन वापर टाळणे, सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करणे, ‘वर्क फ्रॉम ...