जिल्हा माहिती कार्यालयात ‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय गीताचे सामुहिक गायन
वृत्त
क्रमांक :797
बुलढाणा, दि. 07 (जिमाका) : प्रसिध्द लेखक व कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित देशाचे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ या गीताला आज 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा माहिती कार्यालयात वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे सामुहिक गायन करण्यात आले.
यावेळी प्र. जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड,
वरिष्ठ लिपीक प्रतीक फुलाडी, श्रेया दाभाडकर, दप्तरी रामकुमार पाटील व वाहन चालक नामदेव
घट्टे, कौशल्य विकास कार्यालयाचे वरिष्ठ लिपीक सचिन पवार, शुभम पवार उपस्थित होते.
00000

Comments
Post a Comment