दोनचाकी वाहनांसाठी MH-28 CE नवी मालिका सुरू
बुलढाणा, (जिमाका) दि. 3 : दोनचाकी
वाहनांच्या नव्या नोंदणीसाठी परिवहन विभागाकडून MH-28 CE ही नवी मालिका सुरू करण्यात
आली आहे. या मालिकेअंतर्गत पसंती क्रमांकासाठी अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया आज, दि.
3 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाली आहे.
सदर
मालिकेतील क्रमांक MH-28 CE 0001 ते MH-28 CE 9999 पर्यंत उपलब्ध असून, वाहनमालकांना
इच्छित पसंती क्रमांकासाठी निर्धारित शुल्कासह अर्ज करता येणार आहे. नव्या मालिकेच्या
प्रारंभामुळे दोनचाकी वाहनधारकांना नोंदणीसाठी सुलभता मिळणार असून, जिल्ह्यातील वाढत्या
वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर ही नवी मालिका सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती उप प्रादेशिक
परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.
000000
Comments
Post a Comment