संविधान दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन
बुलढाणा, दि. २६ : भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यघटनेच्या
प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन
म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी जिल्हाधिकारी
कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासमवेत राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश
कव्हळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशीव शेलार,
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000


Comments
Post a Comment