गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा दि न्यू इरा हायस्कूलमध्ये आयोजन
बुलढाणा, (जिमाका) दि. 29: जळगाव जामोद येथील दि न्यू इरा हायस्कूल
येथे ‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर साहिब यांच्या 350 व्या शताब्दी वर्षानिमित्त
विशेष कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांच्या हस्ते गुरू तेग बहादूर
यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळे शरद गोमासे यांनीही माल्यार्पण
करून गुरूंना अभिवादन केले.
विद्यार्थ्यांसाठी दाखविण्यात आलेल्या ३ मिनिटांच्या माहितीपूर्ण चित्रफितीतून
गुरू तेग बहादूर यांच्या अद्वितीय त्यागाचा, धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचा
व मानवतेसाठी केलेल्या अप्रतिम कार्याचा आढावा घेण्यात आला.
यानंतर गणेश आसेरकर गुरू तेग बहादूर यांच्या जीवनकार्यावर सखोल माहिती देत विद्यार्थ्यांना
प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
००००



Comments
Post a Comment