आधारभुत किंमत योजना; मुंग, उडिद व सोयाबिन खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन
बुलढाणा, दि.4 (जिमाका):
राज्य शासनाच्या
आधारभुत किंमत योजनेंतर्गत सन 2025-26 वर्षीच्या हंगामामध्ये हमी दरात मुंग, उडिद व
सोयाबिन खरेदीकरीता दि. 30 नोव्हेंबर 2025 पासून नोंदणी सुरु होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी
आवश्यक कागदपत्रांसह खरेंदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी
एस.डी.गावंडे यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये मुंग,
उडिद व सोयाबिन खरेदीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील या कार्यालयअंतर्गत तालुका शेतकी सहकारी
खरेदी विक्री समिती मर्या. बुलढाणा, मेहकर, लोणार, संग्रामपूर, शेगांव व स्वराज्य़
शेतीपुरक सहकारी संस्था, चिखली अशी सहा खरेदी केंद्रांवर नोंदणी सुरु करण्याचे आदेश
देण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांनी नोदंणीसाठी आधारकार्ड, सातबारा ऑनलाईन पिकपेरासह,
बँक पासबुकची आधारलिंक केलेली झेरॉक्स़ व मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रांसह संबंधीत
खरेदी केंद्रावर जाऊन मुंग, उडिद व सोयाबिन खरेदीकरीता नोंदणी करावी, असे आवाहण करण्यात
आले आहे.
000000
Comments
Post a Comment