एकता पदयात्रेस बुलढाणाकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 



               बुलढाणा, (जिमाका) दि. 28: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात आज ‘एकता पदयात्रा’ उत्साहात पार पडली. एन.एस.एस. स्वयंसेवक, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ या घोषणांनी शहर दुमदुमून गेले.

               पदयात्रा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री शाहू कॉलेज ऑफ फार्मसी आणि माय भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. यावेळी राजश्री शाहू कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. शिरीष जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर, जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर, नेहरू युवा केंद्र धनंजय चाफेकर, जिल्हा एनएसएस समन्वय हनुमंत भोसले, प्रकाश केंद्रे, रोहित साळकुटे, दीपक भुसारी, भारत पवार आदी उपस्थित होते.

               कार्यक्रमाची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेला सुरुवात केली. पदयात्रेचा मार्ग राजश्री शाहू कॉलेज ऑफ फार्मसी-सुंदरखेड स्टॉप-कोठारी शोरूम-त्रिशरण चौक असा होता. पदयात्रमध्ये देशभक्तीपर गीते, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेले. पदयात्रेमध्ये एन.एस.एस. जिजामाता कॉलेज तसेच विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

               जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर म्हणाले, सशक्त, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारतासाठी ‘एकता’ हा मूलभूत मंत्र प्रत्येकाच्या मनामनात रुजला पाहिजे. विद्यार्थ्यांनी मानसिक, शारीरिक व भावनिक दृष्ट्या समर्थ राहून देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलावा. सरदार पटेलांच्या नेतृत्वगुणांचा आदर्श घेतला तर देशाची प्रगती निश्चित आहे.

               कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी बोरकर व प्रांजली मापारी यांनी तर आभार रोहिणी जढाळ व मीनल गौर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश चाफेकर, आकाश साळोख, प्रशांत बनसोड यांनी विशेष परिश्रम घेतले.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या