कुष्ठरोग शोध अभियानाला 17 नोव्हेंबर पासून सुरुवात

 

वृत्त क्रमांक :795

बुलढाणा, दि. 07 (जिमाका) : आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षयरोग) सहसंचालक यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कुष्ठरोग शोध अभियान 2025 ला सुरुवात होत आहे. ही मोहिम 17 नोव्हेंबर ते                2 डिसेंबर 2025 या कालावधीत संपूर्ण जिल्हाभर राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेचा प्रमुख उद्देश सन 2027 पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसार हे शासनाने निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करणे हा आहे. समाजातील लपलेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांना त्वरित आणि योग्य उपचार मिळावेत, तसेच कुष्ठरोगाविषयी असलेले गैरसमज दूर व्हावेत, यासाठी ही व्यापक मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या कालावधीत आशा कार्यकर्त्या व पुरुष स्वयंसेवकांची विशेष पथके गावोगावी, घराघरात जावून सर्वेक्षण करणार आहेत. संशयित रुग्णांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना उपचारासाठी आरोग्य सेवेशी जोडले जाणार आहे.

कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. त्यामुळे समाजातील नागरिकांनी कुष्ठरोगाबद्दल भीती बाळगू नये. संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांशी तसेच अधिक माहितीसाठी सहायक संचालक, आरोग्य सुविधा (कुष्ठरोग), बुलढाणा किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या