परवानाधारकाकडील शस्त्रे पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश
• शस्त्रे
जमा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना
बुलढाणा,
दि. 13 (जिमाका): स्थानिक
स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील परवानाधारकाकडे असलेले
शस्त्रे जमा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना छाननी समितीने जाहिर केले आहे. त्याअनुषंगाने
मार्गदर्शक सूचनाचे पालन करुन परवानाधारक व्यक्तींनी आपली शस्त्रे त्वरीत पोलीस स्टेशनमध्ये
जमा करण्याचे निर्देश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील
यांनी निर्गमीत केले आहेत.
छाननी समितीने जाहिर केलेले मार्गदर्शक
सूचना : बँक, संस्था,सोनार,देवस्थान आणि पेट्रोलपंप धारक यांचेकडे असलेले शस्त्रपरवाने
निवडणूक कालावधीत जमा करण्याची आवश्यकता नसल्याचे समितीने निर्णय घेतला आहे. नगरपालीका/नगरपरीषद
क्षेत्रातील शस्त्रपरवानाधारक यांचेकडून शस्त्रे जमा करावी. याव्यतिरिक्त निवडणूकीच्या
कालावधीमध्ये शस्त्र जमा करण्यापासून सुट देण्याबाबत शस्त्र परवानाधारक यांचेकडून विनंती
अर्ज प्राप्त झाल्यास पोलीस विभागाने शस्त्र परवानाधारक यांना सूट देण्याची आवश्यकता
आहे किंवा कसे ? याबाबत सखोल पडताळणी करून त्यांचे स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अर्ज निर्णयार्थ
छाननी समिती समोर सादर केल्या जाईल.
जे शस्त्र परवानाधारक गंभीर स्वरुपाचे
गुन्ह्यात(भारतीय दंड संहिता मधील सर्व प्रकारचे गुन्हे) इत्यादी गुन्ह्यात अडकलेले
आहेत व त्यांना जामीनावर सुटका मिळालेली आहे अशा परवाना धारकांकडून कायदा व सुव्यवस्थेचा
भंग होणार नाही यासाठी त्यांच्याकडील शस्त्र तात्काळ जमा करावी. ज्या शस्त्र परवाना
धारकांना अपराधाची पार्श्वभूमी आहे. तसेच कोणत्याही निवडणूकी दरम्यान घडलेल्या दंगलीमध्ये
कायदा व सुव्यवस्था भंग करण्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या सहभागी असलेल्या शस्त्र
परवानाधारकाचे देखील शस्त्रे पोलीस विभागाकडून जमा करण्यात यावे.
0000
Comments
Post a Comment