जिल्हा रुग्णालयात अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न; अवयवदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा असल्याचा संदेश

 




 

बुलढाणा, दि. 17 (जिमाका): येथील जिल्हा रुग्णालय आणि बजाज हॉस्पिटल, संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अवयवदान जनजागृती कार्यक्रम दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा रुग्णालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजामध्ये अवयवदानाबाबत जागृती वाढविणे आणि त्याचे महत्त्व समजावून देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

 

            या प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. घोटे, नेत्रतज्ञ डॉ. रवी शिंदे, बजाज हॉस्पिटल, संभाजीनगर येथील डॉ. रोडे, (बाह्य रुग्ण विभाग) वैद्यकीय अधिकारी डॉ. घोंगटे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, नेत्र समुपदेशक योगेश सिरसाट, श्री. जाधव तसेच अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली.

 

कार्यक्रमात तज्ञांनी अवयवदानाचे सामाजिक, वैद्यकीय आणि मानवी मूल्यांवरील महत्त्व पटवून दिले. मृत्यूनंतरही अवयवदानाद्वारे अनेकांचे प्राण वाचू शकतात, हा अत्यंत संवेदनशील व प्रेरणादायी संदेश नागरिकांना देण्यात आला. अवयवदानाबाबतच्या विविध प्रक्रियांची माहिती, त्यावरील गैरसमज दूर करणे आणि सामान्य जनतेमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचे मार्गदर्शनही कार्यक्रमात करण्यात आले.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या