संविधान अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रम; 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी दरम्यान शिबीराचे आयोजन

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 25 :  भारतीय संविधानास 75 वर्षपूर्ती निमित्त संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान कार्यक्रमांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी या कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये कार्यालयात दररोज संविधान वाचन, भारतीय संविधानाचे महत्व तसेच जातवैधता प्रक्रियेबाबत मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबविले जाणार आहे.

सन 2025-26 या वर्षात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमात राखीव प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी समितीकडून आवश्यक ते सर्व सहाय्य पुरविण्यात येणार आहे. जातवैधता प्रमाणपत्र मिळविताना अर्जदारांना येणाऱ्या अडचणींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही दिले जाणार आहे. ज्या दावा प्रकरणांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत, त्याबाबत अर्जदारांना CCVIS पोर्टलमार्फत SMS व ई-मेलद्वारे सूचना पाठविण्यात येत असून, अर्जदारांनी तत्काळ समिती कार्यालयात उपस्थित राहून त्रुटी पुर्तता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समितीकडून अशा प्रकरणांवर प्राधान्याने कार्यवाही केली जाणार आहे.

समितीचे अध्यक्ष, उपायुक्त तसेच सदस्य, संशोधन अधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बुलडाणा यांनी अर्जदार व पालकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेण्यासाठी समिती कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या