स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शांत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

 


 * कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

 *प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

बुलढाणा, दि. 12 (जिमाका): आगामी नगरपरिषद/नगरपालिका निवडणुक-2025 शांत, निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सर्व संबंधित विभागांना प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

 

या संदर्भातील बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर जिल्हादंडाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी, विधी अधिकारी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

 

            प्रतिबंधात्मक उपाययोजना : पैशाची व मद्याची अवैध मार्गाने वाहतूक, मतदारांना प्रलोभन ठरतील अशा व अन्य संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथक (Flying Squad) तैनात करण्यात यावे. याकामी आवश्यक असलेले पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावे. या पथकाने योग्य ती तपासणी करुन आवश्यक त्या वस्तू जप्त कराव्यात. नगरपालीका क्षेत्रांतील महत्वाचे नाके, इत्यादी जेथून मद्य /पैशाची अवैध वाहतूक तसेच मतदारांना प्रलोभन ठरतील अशा वस्तूंची/पैशांची वाहतूक होऊ शकते, अशा ठिकाणी चेक पोस्ट तयार करुन वरील पथक नेमावे. या पथकाने योग्य ती तपासणी करुन बेकायदेशीर वस्तू जप्त करुन नियमानुसार पुढील कारवाई करावी. या सर्व गोष्टींचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात यावे.

 

निर्भय, मुक्त व पारदर्शकरितीने निवडणुका घेण्यामध्ये अडथळा येऊ शकेल, अशा व्यक्तींची सराईत गुन्हेगार, गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती, फरार घोषित करण्यात आलेले गुन्हेगार, संशयित व्यक्ती, जामीनावर सुटका केलेले अथवा पॅरोलवर असलेले व तत्सम इत्यादीची यादी तयार करुन त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता, 2023 अन्वये आवश्यक कारवाई करण्यात यावी. शांततेत निवडणुका पार पडाव्यात यासाठी वातावरण अनुकूल ठेवणे आवश्यक आहे. फ्लॅग मार्च, प्रसार माध्यम द्वारे कायदा अंमलबजावणीच्या तयारीची माहिती, गुंडांना आवर घालण्यासाठी खुले सराव शिबिरे आयोजित करणे इत्यादी उपक्रम राबवावेत.

 

यापूर्वीच्या कोणत्याही निवडणुकीतील कायदा व सुव्यवस्था बिघडलेल्या संवेदनशील मतदान केंद्र व सभोवतालचा परिसर यावर लक्ष ठेवण्याबाबत विशेष काळजी घेण्यात यावी. आदर्श आचारसंहीतेचे पालन होईल या करीता मतदारांना प्रलोभन देणे, समाजाच्या विविध घटकांमध्ये तणाव निर्माण करणे, वाहनांचा गैरवापर, दारू विक्री, मालमत्तेचे विदुषीकरण, ध्वनीवर्धकांचा वापर, सार्वजनिक सभा व प्रचार यावर नियंत्रण ठेवावे. नामनिर्देशनपत्र भरताना कायद्याचे व आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात यावा. आचारसंहिता भंगाची तक्रार स्विकारण्यासाठी व त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी आवश्यकते प्रमाणे कंट्रोल रुम/ कॉल सेंटरची स्थापना करण्यात यावी.  मतदारांवर प्रभाव टाकण्याकरीता देण्यात येणाऱ्या वस्तू, मद्य (liquor) पैसा इत्यादींच्या वाटपावर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, इत्यादी विभागांशी समन्वय साधून रेल्वेस्थानक, हॉटेल्स, फार्महाऊस, रिसॉर्ट याठिकाणी होणाऱ्या पैशाच्या, मद्याच्या अवैध मार्गाने होणाऱ्या वाहतुकीवर व अन्य संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे.

 

आचारसंहिता कालावधीमध्ये निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये घडणान्या महत्वाच्या घटना, गिरवणुका, प्रचार केन्या, सभा अथवा आचारसंहितेच्यादृष्टीने महत्वाच्या घटनांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे. पोलीस दलाने आपल्याकडे उपलब्ध व आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची निश्चिती करुन आवश्यक त्या ठिकाणी गृहरक्षक दल, गावसुरक्षा दल, राज्य राखीव दल यांची मदत घ्यावी. संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेशी संपर्क साधून मतमोजणी केंद्र व ईव्हीएम गोडावून यांची संयुक्त पाहणी करावी व सुरक्षीततेच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हादंडाधिकारी यांनी दिलेत.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या