मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
बुलढाणा, (जिमाका) दि. 25 : भारत
सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील
सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित तसेच कायम विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण
घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी
मोहनकुमार ग. व्यवहारे यांनी केले आहे.
सन
2025-26 शैक्षणिक सत्रासाठी महाडीबीटी पोर्टल http://mahadbt.maharashtra.gov.in वर
नवीन तसेच नुतनीकरणाचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी योजनेची कार्यप्रणाली
व इतंभुत माहिती करीता शासन निर्णय दिनांक 17 जानेवारी 2022 तसेच महाडीबीटी पोर्टलवरील
सूचनांचा अभ्यास करून निर्धारित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अभ्यासक्रम
व पात्रता : अकरावी, बारावी, बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी.,
बी.एसडब्ल्यू, एम.एसडब्ल्यू, बी.लिब., एम.लिब., ए.एन.एम., जी.एन.एम., डी.एड., बी.एड.,
एम.एड. तसेच शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण, कृषी, पशुधन, दुग्धव्यवसाय
व मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत मान्यताप्राप्त अभ्यासक्रमातील अनुसूचित जमातीचे विद्यार्थी
शिष्यवृत्ती योजनेस पात्र आहेत.
आवश्यक
कागदपत्रे: बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीचा दाखला,
उत्पन्न प्रमाणपत्र, महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र,
टी.सी., शैक्षणिक मार्कशीट, जात वैधता प्रमाणपत्र.
00000
Comments
Post a Comment