जिल्हाधिकाऱ्यांची राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
नगरपरिषद
निवडणूक :
बुलढाणा, दि.
06 (जिमाका) : राज्य
निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्र जाहीर केला असून
त्याअनुषंगाने जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी आज
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात बैठक घेतली.
या बैठकीला अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे,
निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सुहासिनी गोणेवार, मुख्य
वित्त व लेखाधिकारी प्रकाश राठोड, जिल्हा सह आयुक्त पेंटे व भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी
काँग्रेस, शिवसेना, रिपाई, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.), शिवसेना (उ.बा.ठा.), महाराष्ट्र
नवनिर्माण सेना आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी यावेळी
निवडणूक कार्यक्रमाची माहिती देवून निवडणुक प्रक्रियेची ही संपूर्ण माहिती संभाव्य
उमेदवार व नागरिकांपर्यंत पोहचवावी. मतदार याद्या, निवडणूक आयोगांचे आदेश, सूचनाबाबतची
माहितीपुस्तिका जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर आणि राज्य निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच नियमांचे पालन करुन निवडणुक प्रक्रिया पार पाडावी, असे
आवाहन त्यांनी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले.
00000


Comments
Post a Comment