जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती गठीत

 


 

बुलढाणा, दि. 14 (जिमाका): जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे.

 

या समितीमध्ये जिल्हाधिकारी डॅा.किरण पाटील हे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहणार आहेत. तसेच बुलढाणाचे उपविभागीय अधिकारी, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, दैनिक दिव्य मराठीचे जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मीकांत बगाडे, साम टिव्हीचे जिल्हा प्रतिनिधी संजय जाधव, मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश प्रतिनिधी गणेश निकम, डिजीटल मिडीया परिषदेचे अध्यक्ष गणेश सोळंकी हे या समितीचे सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत. जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत राहणार आहेत.

 

००००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या