जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय गीताचे सामुहिक गायन
वृत्त
क्रमांक :793
बुलढाणा, दि. 07 (जिमाका) : प्रसिध्द लेखक व कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित देशाचे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ या गीताला आज 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे सामुहिक गायन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी
सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार,
जिल्हा सह आयुक्त पेंटे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000

Comments
Post a Comment