नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025; अध्यक्ष पदासाठी 5 तर सदस्यांसाठी 33 नामनिर्देश पत्र दाखल

 नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025;

अध्यक्ष पदासाठी 5 तर सदस्यांसाठी 33 नामनिर्देश पत्र दाखल

 

बुलढाणा, दि. 13 (जिमाका): राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सदस्य व अध्यक्ष पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रमानुसार दि. 10 नोव्हेंबर 2025 पासून नामनिर्देशपत्र दाखल करणे सुरु झाले असून आतापर्यंत नगरपरिषद अध्यक्ष पदासाठी 5 तर सदस्यांसाठी 33 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

 

नामनिर्देशन अर्ज याप्रमाणे : बुलढाणा येथे नगरपरिषद सदस्यासाठी 3, चिखली येथे अध्यक्षासाठी 1 व सदस्यासाठी 8, लोणार येथे अध्यक्षासाठी 1, मलकापूर येथे सदस्यासाठी 6, मेहकर येथे अध्यक्षसाठी 2 व सदस्यासाठी 8, नांदुरा येथे अध्यक्ष व सदस्यासाठी प्रत्येक 1, शेगांव येथे सदस्यासाठी 6, सिंदखेड राजा येथे सदस्यासाठी 1 असे एकूण नगरपरिषद अध्यक्ष पदासाठी 5 तर सदस्यासाठी 33 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या