मुख्य डाकघरात अत्याधुनिक एटीएम सेवा नागरिकांसाठी सुरु
बुलढाणा, दि. 20 (जिमाका): येथील
मुख्य डाकघराच्या आवारात नव्याने अद्ययावत स्वरूपात पुनः सुरू करण्यात आलेल्या एटीएम
सेवेचा शुभारंभ डाकघर विभागाचे अधीक्षक गणेश अंभोरे यांच्या हस्ते आज करण्यात आला.
डाक विभागाच्या तसेच इतर सर्व बँकांच्या ग्राहकांना 24 X 7 सेवा देणारे हे एटीएम आता
नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहे.
या
उद्घाटन प्रसंगी सहायक अधीक्षक कैलास तायडे, सहायक अधीक्षक सतीश निकम, बुलढाणा मुख्य
डाकघराचे पोस्टमास्टर आशीष इंगळे तसेच आयपीपीबी बुलढाणा शाखेचे वरिष्ठ प्रबंधक हिमांशु
धल, तसेच डाक विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डाक
विभागाच्या ग्राहकांसह सर्वच बँकिंग ग्राहकांनी या अत्याधुनिक एटीएम सेवांचा लाभ घ्यावा. अशाच स्वरूपाची सेवा मुख्य डाकघर खामगाव येथेही
सुरू करण्यात आली असून तेथील नागरिकांनीही या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक अधीक्षक
गणेश आभोरे यांनी केले.

Comments
Post a Comment