सैनिक कल्याण विभागात लिपीक टंकलेखकांची भरती; 26 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत
वृत्त
क्रमांक :794
बुलढाणा, दि. 07 (जिमाका) : सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपीक टंकलेखक (गट क) एकूण 72 पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतीम मुदत 5 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली होती. आता अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून इच्छूक उमेदवार 26 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 23.59 वाजेपर्यंत अर्ज करु शकणार आहेत.
इच्छूक उमेदवारांनी विहीत मुदतीत mahasainik.maharashtra.gov.in
/ https://mahasainik.maharashtra.gov.in/v2/register या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment