निवडणूक निरीक्षक ब्रिजेश पाटील यांची लोणार नगरपरिषदेला भेट Ø निवडणूक प्रक्रियेचे केले निरीक्षण ; नागरिकांना तक्रारींसाठी आवाहन
बुलढाणा, दि. 18 नोव्हेंबर: जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू
झाली आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने लोणार नगरपरिषद सार्वत्रिक
निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून वाशिमचे अतिरिक्त जिल्हाधिकारी ब्रिजेश
पाटील यांची नियुक्ती केली असून त्यांनी मंगळवारी (दि. 18) लोणार येथे प्रत्यक्ष
भेट देऊन निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण केले.
दरम्यान निवडणूक निरीक्षक ब्रिजेश पाटील यांनी दि. 15 नोव्हेंबर
2025 रोजी नामनिर्देशन स्वीकारण्याच्या वेळी तसेच दि. 18 नोव्हेंबर 2025 रोजी
नामनिर्देशन छाननीदरम्यान लोणार येथे भेट देऊन निवडणूक कार्यपद्धतीचा आढावा घेतला.
निवडणूक प्रक्रियेबाबत कोणतीही तक्रार, अडचण अथवा गैरप्रकार
आढळल्यास नागरिकांना थेट निवडणूक निरीक्षक यांच्याकडे निवेदने देता येणार आहे.
तसेच त्यांनी ८९७५११९९९९ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. ही निवडणूक
प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन लोणार
नगरपरिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांनी केले आहे.

Comments
Post a Comment