जिल्ह्यातील खरीप हंगामाची सुधारीत पैसेवारी जाहीर

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 3 : सन 2025-26 च्या खरीप हंगामातील बुलढाणा जिल्ह्यातील 1 हजार 420 गावाची सुधारीत पैसेवारी सरासरी 49 पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे. यातील 1 हजार 122 गावांची खरीप हंगामाची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. तर 298 गावांची पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा जास्त आहे.

            50 पैसेपेक्षा कमी अंतिम पैसेवारी असलेले गावे : बुलढाणा तालुक्यात 98, चिखली येथे 144,   देऊळगाव राजा येथे 64, मेहकर येथे 161, लोणार येथे 91, सिंदखेड राजा येथे 114, मलकापूर येथे 73, नांदुरा येथे 112, खामगाव येथे 146, जळगांव जामोद येथे 119 असे एकूण 1 हजार 122 गावांची पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा कमी आहे.

50 पैसेपेक्षा जास्त अंतिम पैसेवारी असलेले गावे: मोताळा येथे 120, शेगांव येथे 73 व संग्रामपूर येथे 105 असे एकूण 298 गावे गावांची पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा जास्त आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या