कुष्ठरोग शोध मोहिमेंतर्गत निपाणा ग्रामसभेत ‘कुष्ठरोग मुक्त गाव’ संकल्प
बुलढाणा, दि. 19 (जिमाका): प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव देवी अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत निपाणा
येथे कुष्ठरोग शोध मोहिमेच्या अनुषंगाने मंगळवार, दि. 18 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामसभा
उत्साहात पार पडली. सरपंच संतोष तांदुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी एकत्रितपणे
‘कुष्ठरोग मुक्त गाव’ करण्याचा संकल्प करत मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दिनांक 17 नोव्हेंबर
ते 2 डिसेंबर 2025 दरम्यान राबविण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय मोहिमेत निपाणा ग्रामस्थांनी
सक्रिय सहभाग नोंदविल्याने गाव कुष्ठरोग मुक्तीसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या प्रसंगी मोताळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलेश
जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकिता इंगळे, डॉ. प्रवीण लहाने,
आरोग्य कर्मचारी श्रीमती दादेराव, ग्रामपंचायत सदस्य जोशी, ग्रामसेवक श्री सुरडकर,
आशा स्वयंसेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसभेत कुष्ठरोगाविषयी
जनजागृती, घराघरात तपासणी, प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर उपचार याबाबत मार्गदर्शन
करण्यात आले. या उपक्रमामुळे निपाणा गावाने आरोग्यदायी आणि रोगमुक्त समाज निर्मितीकडे
भक्कम पाऊल टाकले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
0000


Comments
Post a Comment