देऊळगाव राजा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवारी वंदे मातरम गित गायन कार्यक्रम
बुलढाणा, (जिमाका) दि. 4 : कौशल्य विकास,
रोजगार, उद्योजकता व नविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबईच्या
विद्यमाने देऊळगाव राजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या वतीने शुक्रवार दि. 7 नोव्हेंबर2025
रोजी दीनदयाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव राजा जि. बुलढाणा येथे सकाळी
9.30 वाजता वंदे मातरम गित गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व शाळा,
महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे
आवाहन देऊळगाव राजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्र. प्राचार्य एस. डी. नागरे यांनी
केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष
आमदार मनोजभाऊ कायंदे यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच तहसीलदार वैशाली डोगरजाळ, स्थनिक
परिसरातील प्रशासकिय अधिकारी, शाळा/महाविद्यालयाचे प्राचार्य/मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
00000
Comments
Post a Comment