नगरपरिषद निवडणुकीमुळे शेगाव येथील मंगळवारचा आठवडी बाजार रद्द
बुलढाणा, (जिमाका) दि. 27: शेगांव
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या
दिवशी अर्थात मंगळवारी शेगांवमध्ये भरविण्यात येणारा आठवडी बाजार रद्द
करण्यात आला आहे. असे पत्रक जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील
यांनी जारी केले आहे.
शेगांवमध्ये मंगळवारी आठवडी बाजार भरविण्यात येत असून या आठवडी
बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे वाहतुकीस
अडचण निर्माण होणाची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न
निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. यानुसार दि.2 डिसेंबर रोजीचा शेगांव शहर येथील मंगळवारचा आठवडी बाजार बंद
ठेवण्याबाबत विविध स्तरातून विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे बुलढाणा बाजार आणि
यात्रा कायदानुसार प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करुन शेगांव शहरामध्ये नगरपरिषद
सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्यामुळे कायदा व
सुव्यवस्था तसेच वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही या दृष्टीकोणातून शेगांव
शहरामध्ये मंगळवार 2 डिसेंबर या दिवशी भरविण्यात येणारा आठवडी बाजार रद्द करण्यात
येत आहे, असे पत्रकाद्वारे जिल्हादंडाधिकारी यांनी जाहीर केले आहे.
00000
Comments
Post a Comment