अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानासाठी ई-केवायसी अनिवार्य • शेतकऱ्यांच्या खात्यात डिबीटीव्दारे अनुदान जमा करणे सुरु • ई-केवायसी करण्याचे आवाहन
बुलढाणा, दि. 20 (जिमाका): जिल्ह्यामध्ये
जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर
नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात शासन स्तरावरून केंद्रभूत
पद्धतीने थेट लाभार्थी हस्तांतरण(DBT) प्रणालीमार्फत अनुदान त्यांच्या बँक खात्यात
जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मात्र,
अनेक पात्र शेतकरी लाभार्थ्यांनी आपले ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे त्यांचे अनुदान
वितरित होऊ शकलेले नाही. अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू असून, ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतरच
संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी तातडीने
जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन आपले ई-केवायसी पूर्ण करावे, असे आवाहन निवासी
उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment