माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन; अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
बुलढाणा, दि. 19 (जिमाका): भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी
यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे
यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी श्री. कव्हळे यांनी
उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
यावेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, नायब तहसीलदार प्रमोद करे, नाझर गजानन
मोतेकर यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही दिवंगत पंतप्रधान
इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
00000



Comments
Post a Comment