हंगामानुसार शिफारस केलेल्या बियाण्यांची विक्री करा - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

 

 


बुलढाणा,दि. 11 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्र संचालकांनी बियाणे कायद्याचे पालन करून केवळ त्या-त्या हंगामासाठी शिफारस केलेल्या बियाण्यांचीच विक्री करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

            खरीप, रब्बी किंवा इतर विशिष्ट हंगामासाठी शिफारस केलेले बियाणे केवळ त्या शिफारस केलेल्या हंगामातच विक्रीसाठी ठेवावे. हंगामाबाह्य बियाण्यांची विक्री पूर्णपणे टाळावी. खरीप किंवा लेट खरीप हंगामासाठी शिफारस केलेले कांदा (Onion) किंवा इतर बियाणे रब्बी हंगामात विक्रीस ठेवू नयेत. त्याचप्रमाणे, रब्बी हंगामासाठी शिफारस केलेले मका (Maize) किंवा ज्वारी (Jowar/Sorghum) बियाणे रब्बी हंगाम संपल्यानंतर विक्रीस ठेवू नयेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

कृषी केंद्र संचालकांनी हंगामबाह्य बियाणे विक्रीसाठी कंपन्यांकडून खरेदी करणे तात्काळ थांबवावे. शेतकऱ्यांनी अशा बियाण्यांची खरेदी केल्यामुळे नुकसान झाल्यास संबंधित कृषी केंद्र संचालक यांना जबाबदार धरले जाईल. त्यांच्या विरोधात बियाणे कायद्यानुसार कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योग्य हंगामात योग्य बियाणे उपलब्ध व्हावेत आणि त्यांच्या हिताचे रक्षण व्हावे यासाठी ही सूचना जारी करण्यात आली असून सर्व कृषी केंद्र संचालकांनी या सूचनेची अंमलबजावणी त्वरित व काटेकोरपणे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या