भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना; 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले
बुलढाणा,
दि. 11 (जिमाका): अनुसूचित जाती व नवबौद्ध
प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. योजनेंतर्गत इच्छुक
विद्यार्थ्यांकडून 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.
अनुसूचित
जाती व नवबौद्ध प्रवर्गातील 11 वी, 12 वी व त्यानंतरचे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसाईक
अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेले, सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी
अर्ज केलेले व शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेनंतर वस्तीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या
विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सोयी-सुविधा
स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात
थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली
आहे.
जिल्ह्यातील
अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर शिक्षण घेत असलेल्या
विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेच्या निकषानुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता ऑनलाईन
पध्दतीने https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करणे करणे आवश्यक आहे. मागील
शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेकरीता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी सुध्दा योजनेच्या
निकषाप्रमाणे अर्ज करणे आवश्यक आहे. स्वाधार योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची
यादी कार्यालयातील सुचना फलकावर लावण्यात आलेली असून विद्यार्थ्यांनी अर्जासोबत सर्व
आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज भरतांना काही तांत्रिक अडचणी येत असल्यास
सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,बुलढाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे
सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.
Comments
Post a Comment