अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांना प्रति थेंब अधिक पिक योजना; 90 टक्केपर्यंत अनुदानाचा लाभ

 


बुलढाणा, दि. 03 (जिमाका):  राष्ट्रीय कृषि विकास योजना "प्रति थेंब अधिक पीक" योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचनासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळणार आहे. इच्छुक पात्र अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करुन योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी उपसंचालक ए.बी. गावडे यांनी केले आहे.

 

राष्ट्रीय कृषि विकास योजन प्रति थेंब अधिक पिक(सूक्ष्म सिंचन) योजनेंतर्गत निवड झालेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत आणि क्षेत्राबाहेरील) अंतर्गत पुरक अनुदानानुसार 90 टक्के अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. 

शासन पत्र क्र. डीबीटी-0324/प्र.क्र.71/14 अ. दि. 10 जून 2024 नुसार, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील अल्प व अत्यल्प भुधारक लाभार्थ्यांना अनुक्रमे 25 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पुरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून देण्यात येणार आहे. उर्वरित 10 ते 15 टक्के अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना मधून अदा करण्यात येईल. यामुळे पात्र शेतकऱ्यांना मंजूर मापदंडानुसार एकूण 90 टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळणार आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या