7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास शुभारंभ

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 28: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलनाचा शुभारंभ रविवार, दि. 7 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सैनिकी मंगल कार्यालय, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे होणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा ध्वजदिन निधी संकलन समिती, बुलडाणा यांच्या हस्ते होणार असून मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ध्वजदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व वीर पत्नी, वीर माता-पिता, माजी सैनिक विधवा, माजी सैनिक व त्यांचे अवलंबित, पत्रकार बांधव, तसेच उत्कृष्ट निधी संकलन करणाऱ्या कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

सशस्त्र सेना ध्वजदिन हा राष्ट्ररक्षकांच्या सन्मानाचा दिवस असून, या दिवशी जमा होणारा निधी हुतात्मा आणि माजी सैनिकांच्या कल्याणासाठी वापरला जातो. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून ध्वजदिनाला सन्मान द्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या