कुष्ठरुग्ण शोध अभियानात 53 नवीन रुग्णांची नोंद
बुलढाणा, (जिमाका) दि. 27: जिल्ह्यात
एलसीडीसी कुष्ठरुग्ण शोध अभियान दि. 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात
येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 53 नवीन कुष्ठरुग्णांची नोंद झाले असून त्यांच्यावर
औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत.
कुष्ठरुग्ण
शोध अभियानांतर्गत जिल्ह्यात तब्बल 1 हजार 8 36 प्रशिक्षित तपासणी पथके कार्यरत असून
ते घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करत आहेत. दि. 26 नोव्हेंबर 2025 पर्यंत 17 लाख 3 हजार
408 नागरिकांची शारीरिक तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत 10 हजार 737 संशयित चट्टयांचे
रुग्ण आढळले असून त्यापैकी 7 हजार 866 जणांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी पूर्ण
झाली आहे. नवीन रुग्णांना 6 महिने ते एक वर्षापर्यंत उपचारांचा कालावधी राहणार असून
योग्य उपचार घेतल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो, असे सहाय्यक संचालक (कुष्ठ), डॉ.
हरी पवार यांनी सांगितले.
ही
मोहीम दि. 2 डिसेंबर 2025 पर्यंत सुरु राहणार असून आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा
तसेच पुरुष स्वयंसेवक यांच्यामार्फत घरोघरी भेट देऊन तपासणी केली जात आहे. नागरिकांनी
आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकाला पूर्ण सहकार्य करावे व स्वतःची तपासणी करून घ्यावी,
असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment