अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची कार्यवाही सुरळीत सुरु; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे विजयसिंह देशमुख यांचे आवाहन
बुलढाणा,दि.
10 (जिमाका): मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत
"महामंडळाचे कामकाज बंद झाले आहे, व्याज परतावा थांबविण्यात आला आहे" अशा
प्रकारच्या निराधार अफवा काही व्यक्तींकडून सोशल मीडियासह विविध माध्यमांतून पसरवल्या
जात आहेत. या अफवांना कोणतेही तथ्य नसून, महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे
काम वगळता इतर रार्व कामकाज सुरळीतपणे सुरु असल्याची माहिती विजयसिंह देशमुख, व्यवस्थापकीय
संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
दिली.
महामंडळाच्या वेब प्रणालीचे दि. १० ऑक्टोबर पासून
अपग्रेडेशनचे काम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये वेब प्रणालीचे Security Audit प्रलंबित
होते ते पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत,
महामंडळाने स्वतः हुन एलओआय (LOI) व बँक सेक्शन (Bank Sanction) या दोन सेवा अधिसुचित
केल्या आहेत. या नुसार या सेवा १५ कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत देण्याचे बंधन महामंडळाने
स्वतः वर घालून घेतले आहे. याबाबत आवश्यक ते बदल वेब प्रणालीमध्ये करणे सुरु आहे. एजंटमार्फत
लाभार्थ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबावी यासाठी म्हणून महामंडळाने CSC केंद्रांद्वारे
फक्त ७० रुपयांत सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी MOU केला आहे. त्यास अनुषंगाने वेबप्रणालीमध्ये
आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरु आहे. लाभार्थ्यांना महामंडळाच्या सर्व सेवा थेट मोबाईलद्वारे
देता याव्यात म्हणून मोबाईल ॲप विकसित होत आहे. यासाठी वेवप्रणालीमध्ये आवश्यक ते बदल
करणे सुरु आहे.
राज्यात विविध ठिकाणी एजंटमार्फत लाभार्थ्यांची
आर्थिक फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने, सद्यस्थितीत नाशिक व अहमदनगरमध्ये संबंधितांवर
फौजदारी गुन्हे नोंद केले गेले आहेत. असे प्रकार घडू नयेत यासाठी वेब प्रणालीमध्ये
आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरु आहे. राष्ट्रीयकृत बँका सोबत बँक API एकत्रीकरण सुरु
असून, लाभार्थ्यांना सुरळीत व सहजपणे व्याज परतावा मिळणार आहे. चॅट जीपीटी स्मार्ट
बोट (Chat GPT Smart Bot) प्रणाली विकसित करण्यात आली आहे, जी लाभार्थ्यांना महामंडळाच्या
योजनांबाबत मार्गदर्शन व माहिती देईल. योजनांतर्गत काही असे व्यवसाय निदर्शनास आले
आहेत की, त्यामधून अपेक्षित स्वयंरोजगारनिर्मिती होत नाही अशा व्यवसायांबाबतचा अंकेक्षणाबाबत
योग्य निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेणे प्रस्तावित आहे. तसेष मराठा समाजातील युवकांसाठी
नवीन व्यवसाय कसे निर्माण करता येऊ शकतील? ही बाब विचाराधीन आहे. लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन
वेबीनार च्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम देखील सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी
व्याज परताव्याकामी लाभार्थ्यांना एका वेळेस कमाल ३ क्लेम सादर करता येत होते. मात्र
सद्यस्थितीत लाभार्थ्यांना एका वेळेस कमाल ६ क्लेम सादर करता येत आहेत.
तरी कोणत्याही प्रकारच्या राजकीय, दिशाभूल करणाऱ्या
किंवा अफवांवर आधारीत माहितीवर विश्वास ठेवू नये असेही श्री. देशमुख यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment