बुलढाणा जिल्ह्यातील १ हजार ४२० गावांची खरीप पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ४२ पैसे; सुधारित पैसेवारी जाहीर
बुलढाणा, दि. ३०
(जिमाका) : सन
२०२६-२७ च्या खरीप हंगामातील बुलढाणा जिल्ह्यातील सुधारित पैसेवारी जिल्हा प्रशासनाने
जाहीर केली आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार ४२० गावांपैकी सर्वच गावांची पैसेवारी ५०
पैशांपेक्षा कमी आली आहे. विशेष म्हणजे, ५० पैशांपेक्षा जास्त पैसेवारी असलेले एकही
गाव नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ४२ पैसे आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार,
बुलढाणा तालुक्यातील ९८, चिखली १४४, देऊळगाव राजा ६४, मेहकर १६१, लोणार ९१, सिंदखेड
राजा ११४, मलकापूर ७३, मोताळा १२०, नांदुरा ११२, खामगाव १४६, शेगाव ७३, जळगाव जामोद
११९ आणि संग्रामपूर तालुक्यातील १०५ गावांचा समावेश आहे. या सर्व १ हजार ४२० गावांची
पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी नोंदविण्यात आली आहे. तालुकानिहाय सरासरी पैसेवारीमध्ये
बुलढाणा ३१ पैसे, चिखली ४०, देऊळगाव राजा ४२, मेहकर ४५, लोणार ४६, सिंदखेड राजा ४२,
मलकापूर ४६, मोताळा ४६, नांदुरा ३८, खामगाव ४१, शेगाव ४६, जळगाव जामोद ४३ आणि संग्रामपूर
४६ पैसे अशी सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी
सुधीर खांदे यांनी दिली.
0000

Comments
Post a Comment