शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी २ सप्टेंबरला सोडत

 

शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी २ सप्टेंबरला सोडत

 

बुलढाणा, दि. ३१(जिमाका) : राज्य शासनाच्या ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ या राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी पात्र शेतकऱ्यांना युरोप व चीन या देशांमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी प्राप्त पात्र अर्जांमधून लाभार्थ्यांची निवड सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे.

 

या अभ्यास दौऱ्याचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढ, सेंद्रिय शेती, फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, कृषी यांत्रिकीकरण, कृषी प्रक्रिया, निर्यातीच्या संधी तसेच कृषी बाजार व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा आहे. परदेशातील प्रगत कृषी पद्धतींचा अभ्यास करून त्याचा उपयोग आपल्या शेतीमध्ये करण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे.

 

या योजनेसाठी प्राप्त झालेल्या पात्र अर्जांमधून लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी बुधवार, २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत जिल्हा प्रशिक्षण केंद्र, घाट रोड, बुलढाणा येथे होईल.

सोडत प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. तसेच सोडतीचा निकाल आणि निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी (प्रतीक्षा यादीसह) त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 

या योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या