सी.ई.ओ. संग्राम अभियानातील १०० ग्रामपंचायतींचा १४ ऑगस्ट रोजी गौरव
बुलढाणा दि.
12 (जिमाका): जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासीबहुल,
तांडावस्ती तसेच डोंगराळ भागातील ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सी.ई.ओ. संग्राम अभियान (संवेदनशील ग्राम)
सन २०२५-२६ राबविण्यात आले. या अभियानात जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग
नोंदवून अभियान यशस्वी केले. स्वयंमूल्यांकनाच्या आधारे यापैकी १०० ग्रामपंचायती पुरस्कारासाठी
पात्र ठरल्या आहेत.
या पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा
गौरव सोहळा दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गर्दे वाचनालय सभागृह, बुलढाणा येथे
आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री मकरंद जाधव (पाटील), केंद्रीय राज्यमंत्री
(आयुष) स्वतंत्र प्रभार प्रतापराव जाधव तसेच जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आमदार उपस्थित
राहणार आहेत.
यावेळी संबंधित सरपंच/प्रशासक
आणि ग्रामपंचायत सचिवांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार असून,
प्रत्येक पात्र ग्रामपंचायतीला ५१ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात येणार आहे.
दुर्गम व वंचित भागातील ग्रामपंचायतींनी विकासाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा,
प्रशासन अधिक संवेदनशील व लोकाभिमुख व्हावे आणि ग्रामस्तरावरील विकासकामांना गती मिळावी,
या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या अभियानातील यशस्वी ग्रामपंचायतींच्या कामगिरीचे
या सोहळ्यात कौतुक करण्यात येणार आहे.
00000
Comments
Post a Comment