ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार, पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सुरू
बुलढाणा दि. 14
(जिमाका): इतर
मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील
विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि धनगर (भटक्या
जमाती-क) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजना
राबविण्यात येत आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या
विद्यार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
जिल्हास्तरावरील नव्याने प्रवेश घेतलेल्या
विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणे अनिवार्य आहे.
आरक्षणानुसार अथवा गुणानुक्रमानुसार वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास अशा
विद्यार्थ्यांना आधार अथवा स्वयम् योजनेचा लाभ मिळणार आहे. तालुकास्तरावरील
विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज न करता थेट आधार अथवा स्वयम् योजनेसाठी
अर्ज सादर करावा.
या योजनांसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया
दि. १२ ऑगस्ट २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी http://hmasnew.mahait.org/ या पोर्टलवर
ऑनलाइन अर्ज भरावा.
ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची प्रत आवश्यक सर्व
कागदपत्रांची पूर्तता करून सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जिल्हा
कार्यालय, बुलढाणा येथे सादर करावी.
विद्यार्थ्यांनी
विहित मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास
बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक श्री. दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment