Skip to main content
शासकीय तंत्रनिकेतन खामगाव येथे ११ ऑगस्टला अतिरिक्त प्रवेश फेरी
बुलढाणा, दि. 7(जिमाका): तंत्रशिक्षण
संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी
पदविका अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या चार फेऱ्यांनंतर संस्थेत रिक्त
राहिलेल्या जागांसाठी अतिरिक्त प्रवेश फेरी आयोजित करण्यात आली आहे. ही प्रवेश फेरी
शासकीय तंत्रनिकेतन, खामगाव येथे मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता
घेण्यात येणार आहे.
या प्रवेश फेरीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत
नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी आवश्यक मूळ प्रमाणपत्रे आणि विहित शुल्कासह वेळेवर
उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी अन्य संस्थेत प्रवेश घेतलेला
असल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या वेळी Proforma-N सादर करणे आवश्यक आहे.
दि. ११ ऑगस्टच्या फेरीनंतरही जागा शिल्लक राहिल्यास दि. १३ व १४ ऑगस्ट २०२६
रोजी उर्वरित जागांसाठी अंतिम अतिरिक्त प्रवेश फेऱ्या राबविण्यात येणार आहेत. रिक्त
जागांचा तपशील तसेच विहित शुल्काची माहिती शासकीय तंत्रनिकेतन खामगावच्या
www.gpk.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक
विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य तथा प्रथम वर्ष प्रवेश
समितीने केले आहे.
00000
Comments
Post a Comment