पिंप्री गवळी येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवेवर दोन दिवसीय कार्यशाळा;

 

पिंप्री गवळी येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवेवर दोन दिवसीय कार्यशाळा;

माझे गाव, आरोग्य संपन्न गावअभियानांतर्गत विविध विषयांवर मार्गदर्शन

 

बुलढाणा दि.20(जिमाका) : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘कस काय?’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंप्री गवळी येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) विषयावर १७ व १८ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

 

गावातील प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक, सुलभ व लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्यविषयक जनजागृती वाढविणे, आजारांचे प्रतिबंध व लवकर निदान करणे तसेच आरोग्य व्यवस्थापनात समुदायाचा सक्रिय सहभाग वाढविणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.

 

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा पाटील, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव तसेच सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

 

दोन दिवसीय प्रशिक्षणादरम्यान डॉ. शिवानंद शिंगाडे, डॉ. संतोष सांगळे, डॉ. शैलेश खंडारे, डॉ. जीवन भारती, सुवर्णा बेलसरे, स्वाती शेंडे, कविता खाडे, सुनीता जंवजाळ व सुलोचना पन्हाड यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत समग्र व सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC), माता व बाल आरोग्य सेवा, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध व नियंत्रण, आरोग्यविषयक जनजागृती व आरोग्य शिक्षण, समुदायस्तरीय आरोग्य व्यवस्थापन, आजारांचे लवकर निदान व उपचार आदी विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले.

 

या कार्यशाळेमुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना अधिक प्रभावी, सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यास तसेच गावपातळीवर आरोग्यविषयक जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांना अधिक बळ मिळणार आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या