‘हर घर तिरंगा २०२६’ अंतर्गत बुलढाण्यात भव्य तिरंगा रॅली; ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन

 


बुलढाणा दि. 14 (जिमाका): भारत सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला लोकसहभागाची व्यापक चळवळ म्हणून यश मिळाले असून, यावर्षी राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘हर घर तिरंगा २०२६’ आणि ‘वंदे मातरम्’ या दोन्ही उपक्रमांचे एकत्रित आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध प्रत्यक्ष व डिजिटल उपक्रमांद्वारे राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान आणि ‘वंदे मातरम्’चा जागर करण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वतीने खेळाडूंची भव्य तिरंगा रॅली आणि ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलढाणा येथे होणार आहे.

या रॅलीमध्ये जिल्हा प्रशिक्षण केंद्रात नियमित सराव करणारे सुमारे १५० ते २०० खेळाडू सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि तिरंग्याप्रती अभिमानाची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानात जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी होऊन ‘आझादी का अमृत महोत्सव’ व्यापक स्वरूपात साजरा करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भक्ती आंब्रे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या