सेसफंड योजनेअंतर्गत कृषी यंत्रसामग्रीसाठी ७५ टक्के अनुदान; शेतकऱ्यांनी २० सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा

 

सेसफंड योजनेअंतर्गत कृषी यंत्रसामग्रीसाठी ७५ टक्के अनुदान; शेतकऱ्यांनी २० सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा

 

बुलढाणा, दि. २५ (जिमाका) : जिल्हा परिषद बुलढाणा कृषी विभागाच्या सेस फंड योजनेअंतर्गत सन २०२६-२७ मध्ये शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्रसामग्रीसाठी ७५ टक्के अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनेतून ५ एच.पी. मोटारपंप संच, ट्रॅक्टरचलित रोटाव्हेटर, बी.बी.एफ. प्लांटर, पेरणी यंत्र आदी साहित्य पुरविण्याचे प्रस्तावित आहे.

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील पंचायत समितीमधील कृषी विभागातील कृषी अधिकारी (सामान्य) तसेच विस्तार अधिकारी (कृषी) यांच्याशी संपर्क साधावा.

 

योजनेअंतर्गत विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे दि. २० सप्टेंबर २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद बुलडाण्याचे कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतीत अर्ज सादर करून उपलब्ध अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या