विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत मतदार याद्या प्रसिद्ध मृत, गैरहजर व कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांसह अन्य प्रवर्गांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध

 



बुलढाणा, दि. 13 (जिमाका) : भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार बुलढाणा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील एकूण 20 लाख 89 हजार 965 मतदारांना गणनापत्रकांचे वाटप करून त्यांचे डिजिटायझेशन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील एकही पात्र मतदार मतदारयादीत नाव येण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने 11 ऑगस्ट 2026 रोजी भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत ERO Net प्रणालीवरून मृत मतदार (Death), गैरहजर मतदार (Absent), कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार (Permanently Shifted), इतर मतदार (Others) तसेच मतदार यादीमध्ये यापूर्वीच समाविष्ट झालेले (Already Enrolled) मतदार यांची विधानसभा मतदारसंघनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ही यादी बुलढाणा जिल्ह्याच्या https://buldhana.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरिक, मतदार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीची सखोल पाहणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. एखाद्या पात्र मतदाराचे नाव अनावधानाने यादीत आलेले नसल्यास किंवा मतदाराचा अचूक पत्ता आढळून न आल्याने संबंधित BLO यांनी त्या मतदारास Uncollectable वर्गवारीत समाविष्ट केले असल्यास, अथवा मतदाराने आपले गणनापत्रक (Enumeration Form) संबंधित BLO यांच्याकडे जमा केले नसल्यामुळे त्यांचे नाव वरील यादीत समाविष्ट झाले असल्यास, संबंधित मतदारांनी तत्काळ आपल्या क्षेत्रातील BLO यांच्याशी संपर्क साधावा.

तसेच गणनापत्रकाचे Rollback करून योग्य तपशीलासह ते पुन्हा भरून द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्वांनी मतदार यादीची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली मतदार यादी QR Code Google Lens द्वारे स्कॅन करून मोबाईलवरही सहज पाहता येईल.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या